
शाश्वत पर्यायांची गरज
विषय ः कृषी
कृषी क्षेत्रात बदल घडवायचे असेल तर नावीन्य, तंत्रज्ञान व शाश्वत पर्यायांची गरज आहे. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेट देत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत पर्याय म्हणून त्यांना उस्मानाबादी शेळीच्या दुधाच्या पदार्थांबाबत पर्याय सुचविला. यातीलच एक ''गोट मिल्क सोप'' या नव्या पदार्थाची निर्मिती केली. राज्यात पाच लाखांहून अधिक सामाजिक संस्था आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी सरकारच्या १३० हून अधिक योजना आहेत. शेतकऱ्यांपर्यंत या संस्था आणि योजना पोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिवार फाउंडेशनच्या माध्यमातून शिवार हेल्पलाइन आणि शेतकरी मित्र केंद्र स्थापित करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या दीड वर्षात १३४ शेतकरी आत्महत्या या हेल्पलाइनमुळे थांबविणे शक्य झाले असून १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मदत केली आहे. राज्यात १३ हजारांहून अधिक स्टार्टअप कृषी क्षेत्रात काम करत आहेत.
- विनायक हेगाना, संस्थापक, शिवार फाउंडेशन
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61716 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..