‘आरसीएफ’च्या दोन नव्या खतांचे मुंबईमध्ये अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आरसीएफ’च्या दोन नव्या 
खतांचे मुंबईमध्ये अनावरण
‘आरसीएफ’च्या दोन नव्या खतांचे मुंबईमध्ये अनावरण

‘आरसीएफ’च्या दोन नव्या खतांचे मुंबईमध्ये अनावरण

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ ः रसायने आणि खते, तसेच अपारंपरिक ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री भगवंत कुंभ यांनी नुकतीच राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायजर्सच्या (आरसीएफ) ट्रॉम्बे येथील कारखान्याला भेट दिली. यावेळी त्यांनी आरसीएफच्या सुफला १०ः२६ः२६ व विपुला १०ः१०ः१० या दोन नव्या खतांचे अनावरण केले.
एनपीके ग्रेडच्या सुफला १०ः२६ः२६ हे समतोल खत असून, ते सर्व प्रकारच्या खतांसाठी उपयोगी पडते. त्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशिअमचे प्रमाण एनपीके प्रकारांतील सर्व खतांत सर्वाधिक आहे. हे खत ऊस, गहू, बटाटा, कापूस, शेंगदाणा, सोयाबिन अशा अनेक पिकांसाठी उपयुक्त आहे. या खतामुळे मुळांची चांगली वाढ होते व पीकही चांगले मिळते. यामुळे उसातील साखरेचे व बटाट्यातील स्टार्चचे प्रमाण वाढते, असे कंपनीने स्पष्ट केले. विपुला १०ः१०ः१० शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, पिकातील पोषक मूल्यांचा ऱ्हास रोखणे व पर्यावरणाचे प्रदूषण रोखून अधिक अन्नधान्य मिळविण्यास मदत करते. हे खत आरसीएफच्या संशोधन आणि विकास विभागाची निर्मिती आहे. हे खत विविध पिके आणि विविध हवामान स्थितीमध्ये वापरण्यास योग्य आहे. या खताचे संतृप्त द्रवाचा उपयोग केल्यास पिके अधिक प्रमाणात पौष्टिक मूल्ये शोषून घेत असल्याचे संशोधनात आढळले आहे. या खतामुळे गव्हाचे उत्पादन ३० टक्क्यांनी, तर तांदळाचे उत्पादन २१ टक्क्यांनी वाढल्याचे आढळून आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61720 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top