दिग्गजांनी उलगडली अनुभवांची शिदोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिग्गजांनी उलगडली अनुभवांची शिदोरी
दिग्गजांनी उलगडली अनुभवांची शिदोरी

दिग्गजांनी उलगडली अनुभवांची शिदोरी

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : ‘देशासाठी काहीतरी करायचे!’ असे प्रत्येकाला वाटते. पण, त्यासाठी नेमके काय करायचे, कसे करायचे याचे उत्तर मिळावे, करिअरची नेमकी दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शन घेणे, अशा उद्देशाने ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या माध्यमातून एकवटलेल्या युवक-युवतींना दिग्गज मान्यवरांनी उलगडलेली मार्गदर्शनाची, अनुभवाची शिदोरी भेट स्वरूपात मिळाली.
निमित्त होते ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे (यिन) आयोजित दोन दिवसीय ‘यिन समर यूथ समिट’च्या शुभारंभाचे. या समिटचे उद्‌घाटन सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ‘चला घडू देशासाठी’ या हेतूने शेकडो तरुण यात सहभागी झाले होते. ‘समिट’मध्ये देशाचे भविष्य तरुण म्हणून काय करणे अपेक्षित आहे, त्यासाठी तज्ज्ञ, मार्गदर्शकांकडून मिळणारे प्रोत्साहन तरुणांना नवे चैतन्य देणारे ठरले. प्रत्येक व्याख्यानात, परिसंवादात, चर्चेत ‘यिन’च्या सदस्यांनीही मान्यवरांना प्रश्न विचारत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाबरोबर यावेळी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे तरुणांचा जल्लोष उत्तरोत्तर वाढत होता. अशा चैतन्यमय वातावरणात या समिटची सुरवात झाली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रातील वक्ते नेमके काय सांगताहेत, याकडे लक्ष देत महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी लिहून घेत कार्यक्रमात सहभाग नोंदविला. क्रिएटिव्ह थिंकिंग, कृषी, स्पर्धा परिक्षा, सामाजिक कार्य, आर्थिक साक्षरता अशा विषयांवर तरुणांना मार्गदर्शन करण्यात आले. शेरो-शायरी, कविता आणि नृत्यकलांच्या सादरीकरणामुळे सभागृहात अद्भूत ऊर्जेचा संचार झाल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61730 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top