
संत ज्ञानेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
विश्रांतवाडी, ता. १० ः तीच शाळा... तोच वर्ग.. अन् सभोवती तेच बालसवंगडी निमित्त होते येरवड्यातील
संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे. या मेळाव्यात एकमेकांच्या सुखदुखांची देवाणघेवाण करीत गप्पांचा फड उत्तरोत्तर रंगत गेला.
संत ज्ञानेश्वर विद्यालयातील १९८१ सालच्या पाचवी ते सातवीच्या वर्गमित्रांनी एकत्र येत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी तत्कालीन गुरुजन हनुमंत सस्ते, दिलीप लोखंडे, बबन तापकीर, भानुदास खांदवे, सीता रासकर, बाळकृष्ण बाचल, विलास रासकर, लता पाडेकर आदींचा यथोचित गौरव करण्यात आला.
प्रत्येकाने आपल्यातील ताकद ओळखून स्वतःची तसेच समाजाची प्रगती साधली पाहिजे. पैशाच्या मागे न धावता
आत्मिक समाधान महत्त्वाचे असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक संजय सुपे यांनी सांगितले. प्रयत्नांची पराकाष्ठा करून जीवनात यश साध्य करावे, असे सुनीता भैरवकर यांनी सांगितले, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जीवनाच्या या टप्प्यावर आल्याचे सर्व श्रेय गुरुवर्यांना जात असल्याचे माजी विद्यार्थी प्रशांत खंडाळे यांनी सांगितले.
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशांत खंडाळे, मारुती साबळे, सुरेश विघावे, मिलिंद शिंदे, रिझवान इनामदार, ज्ञानेश्वर गुंजाळ, अशोक इटकर, महेंद्र तिखे, उमेश साळवी, मिलिंद जाधव, श्याम वाघमारे, चंद्रकांत घोडके आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपत बरकडे यांनी केले.
-----------
येरवडा ः स्नेहमेळाव्यात सहभागी झालेले संत ज्ञानेश्वर विद्यालयातील माजी विद्यार्थी, समवेत गुरुजन.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61749 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..