‘सिंहगडावरील बससेवेचे दर कमी करावेत’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सिंहगडावरील बससेवेचे दर कमी करावेत’
‘सिंहगडावरील बससेवेचे दर कमी करावेत’

‘सिंहगडावरील बससेवेचे दर कमी करावेत’

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : पीएमपीने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सिंहगड किल्ल्यावर ई-बसची सेवा सुरू केली. मात्र त्याचे तिकीट दर सामान्य प्रवाशांना परवडणारे नाहीत. गडावर जाऊन येण्यासाठी मोठ्यांना शंभर रुपये खर्चावे लागत आहेत. तिकिटाची ही रक्कम तत्काळ कमी झाली पाहिजे, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा मनसेने दिला आहे. पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक राजेश रूपनवर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सिंहगडाच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाने पाहिला पाहिजे. त्यासाठी पीएमपीने ना नफा ना तोटा ही सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना बससेवा मोफत असावी, चार्जिंगअभावी बस बंद पडण्याच्या घटना घडू नये, ही अपेक्षा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या वेळी प्रशांत कनोजिया, कैलास दांगट, चंद्रकांत गोगावले, सचिन काटकर, विजय मते, सचिन पांगारे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61762 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top