अ.भा. ग्राहक पंचायतीच्या उपाध्यक्षपदी सूर्यकांत पाठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अ.भा. ग्राहक पंचायतीच्या
उपाध्यक्षपदी सूर्यकांत पाठक
अ.भा. ग्राहक पंचायतीच्या उपाध्यक्षपदी सूर्यकांत पाठक

अ.भा. ग्राहक पंचायतीच्या उपाध्यक्षपदी सूर्यकांत पाठक

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सूर्यकांत पाठक (पुणे) आणि राष्ट्रीय सचिव म्हणून अरुण देशपांडे (औरंगाबाद) यांची निवड केली आहे. हरियानातील फरिदाबाद येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची सर्वसाधारण सभा पार पडली. त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गुजरातमधील बडोद्याचे नारायण शहा यांची फेरनिवड केली आहे. तीन दिवस चाललेल्या या सभेस देशभरातून २३७ प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत पुढील तीन वर्षांसाठी ३४ सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. पाठक हे ग्राहक पंचायतीच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र प्रांताचे संघटनमंत्री, क्षेत्रीय संघटनमंत्री तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. देशपांडे यांनी यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61768 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top