सर्वोच्च न्यायालयाचा आदेश: जिल्हा प्रशासनाची कार्यवाही नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश: जिल्हा प्रशासनाची कार्यवाही  
नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश: जिल्हा प्रशासनाची कार्यवाही नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश: जिल्हा प्रशासनाची कार्यवाही नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून पुणे जिल्ह्यातील सुमारे १२ नगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असून त्यावर हरकती-सूचना घेण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.

राज्यात मुदत संपलेल्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया आयोगाने सुरु केली होती. परंतु, मध्यंतरी राज्य सरकारने कायद्यात बदल करत आयोगाचे अधिकार स्वत:कडे घेतले होते. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली होती. दरम्यान, सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने दोन आठवड्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सरकार व आयोगाला दिले आहेत. त्यानुसार आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

पुणे जिल्ह्यात १२ नगरपालिका आहेत. यापूर्वीच त्यांची प्रारूप प्रभाग रचना तयार केली असून त्यास आयोगाकडून मान्यता मिळाली आहे. त्यावर दाखल हरकती-सूचना स्वीकारण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली होती. परंतु, दोन दिवसात राज्य सरकारकडून ती थांबविण्यात आली होती. ती मंगळवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. १७ मेपर्यंत हरकती-सूचना दाखल करून घेण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी प्रारूप प्रभाग रचनेवर ज्या नागरीकांनी हरकती दाखल केल्या आहेत. त्या हरकतींचा देखील विचार करण्यात येणार आहे.

या नगरपालिकांचा समावेश
जेजुरी, इंदापूर, राजगुरुनगर, तळेगाव, दौड,चाकण, जुन्नर, आळंदी, शिरूर, सासवड, बारामती, लोणावळा या नगरपालिका आणि मंचर नगरपंचायत यांच्या यात समावेश आहे. दाखल हरकती-सूचनांवर सुनावणी घेऊन त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी प्रभाग रचना आयोगाकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर मतदार याद्या अंतिम करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे महापालिकेसाठी
दोन दिवसांत आदेश?
पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपुष्टात आली आहे. त्यापूर्वी महापालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना तयार करून त्यावर दाखल हरकती-सूचनांची सुनावणी घेऊन अंतिम मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. असे असताना सरकारने ती रद्द करून नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आयोगाला दिले आहेत. त्यानुसार नगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या दोन दिवसांत पुणे महापालिकेची प्रक्रिया सूर करण्याचे आदेश येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61782 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top