जुन्या वादातून खुनाचा प्रयत्न; आरोपींना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या वादातून खुनाचा प्रयत्न; आरोपींना अटक
जुन्या वादातून खुनाचा प्रयत्न; आरोपींना अटक

जुन्या वादातून खुनाचा प्रयत्न; आरोपींना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः जुन्या भांडणाच्या वादातून एकाच्या घरात घुसून टोळक्‍याने त्याच्यावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला. या गुन्ह्यातील तीन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

रणजित विलास परदेशी, शेरू ऊर्फ श्रीनाथ विलास परदेशी, चिराग महेश जोशी (सर्व रा. जोशी आळी, शिवाजीनगर गावठाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सागर नंदकुमार दळवी (रा. शिवाजीनगर गावठाण) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी सागर दळवी व आरोपींची पूर्वी भांडणे झाली होती. त्या रागातूनच त्यांनी तीन मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरात घुसून त्यांच्या हातातील पालघन व कोयत्याने डोक्‍यावर वार केले होते. या घटनेत दळवी हे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू होता. आरोपी शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळ आले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्यांना अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61788 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top