
वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना बेड्या
पुणे, ता. ९ ः शुक्रवारी पहाटेच्यावेळी रस्त्यावर कोयते घेऊन दहशत माजविण्याबरोबरच रस्त्यांवर लावलेल्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना समर्थ पोलिसांनी अटक केली. संबंधित टोळक्याने मंगळवार पेठेसह चतुःशृंगी परिसरात वाहनांची तोडफोड केली होती.
शुभ शिवाजी खंडागळे (वय २१ ), विनायक गणेश कापडे (वय २०), यश दत्ता हेळेकर (वय २२), साईनाथ विठ्ठल पाटोळे (वय २३, रा.विमाननगर ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आरोपींनी चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवार पेठेतील सदानंदनगर इमारतीसमोर व स्वरुपवर्धिनी शाळेसमोर फटाके उडवून नागरीकांना शिवीगाळ केली होती. तसेच हातात कोयते, लाकडी दांडके घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करीत दहशत निर्माण केली होती. त्यावरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यातील आरोपींचा पोलिस शोध घेत होते. दरम्यान, सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे त्यांनी वापरलेल्या वाहनांचे दुचाकी क्रमांक प्राप्त करून गाडी वापरणारांची माहिती मिळविली. त्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींनी सापळा रचून अटक केली. तसेच त्यांच्यासमवेत दोन अल्पवयीन बालकांनाही ताब्यात घेतले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61797 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..