‘एनडीए’च्या प्रवेश प्रक्रियेचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एनडीए’च्या प्रवेश 
प्रक्रियेचा निकाल जाहीर
‘एनडीए’च्या प्रवेश प्रक्रियेचा निकाल जाहीर

‘एनडीए’च्या प्रवेश प्रक्रियेचा निकाल जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४९ व्या तुकडीच्या प्रवेश प्रक्रियेचा निकाल अखेर सोमवारी (ता. ९) ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.
एनडीएच्या १४९ व्या तुकडीच्या प्रवेश प्रक्रियेची लेखी परिक्षा १० एप्रिल २०२२ दरम्यान झाली होती. लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची आता सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखतीची प्रक्रिया होणार आहे. यूपीएससीने जाहीर केलेल्या सूचनेनुसार लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना joinindianarmy.nic.in या सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर येत्या दोन आठवड्यात आपले रजिस्ट्रेशन करणे आवश्‍यक आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना एसएसबी केंद्र आणि तारखा निवडण्यासाठीची माहिती पाठविण्यात येणार आहे. निकाल आणि पुढील प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61803 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top