
नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक
पुणे, ता. ९ ः सिंगापूर येथे चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणीची दीड लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अजय देवकर (रा. शिखपिंपरी,गेवराई,बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ ते १५ एप्रिल २०२२ या कालावधीमध्ये घडला आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही शहरातील एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीला आहे. दरम्यान, एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून तरुणीची देवकर समवेत ओळख झाली. त्यानंतर देवकर याने फिर्यादी तरुणीचा विश्वास प्राप्त केला. दरम्यान, त्याने तरुणीला सिंगापूर येथे चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देतो, असे सांगून तरुणीकडून वेळोवेळी एक लाख ५३ हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतरही त्याने फिर्यादी तरुणीला कोणत्याही प्रकारची नोकरी लावली नाही. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61807 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..