पुण्यात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरण
पुण्यात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरण

पुण्यात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरण

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. पुढील आठवडाभर हे चित्र कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. शहरात सोमवारी ३८.६ अंश सेल्सिअस कमाल, तर २६.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

कमाल तापमानाचा पारा घसरला असला तरी किमान तापमानात चांगलीच वाढ झाली. सरासरीपेक्षा किमान तापमानात सुमारे ४ अंशांनी वाढ झाली. त्यामुळे उकाडा जाणवत होता. येत्या रविवारपर्यंत (ता. १५) शहर परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला येथे ४५.८ अंश सेल्सिअस, तर नीचांकी तापमान मालेगाव येथे २२.२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. उष्णतेमुळे तापदायक ठरलेल्या मार्च व एप्रिलची स्थिती पाहता मे महिन्यात मात्र उन्हाची तीव्रता काहीशी कमी जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात देखील वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांसोबत उकाडा अनुभवायला मिळत आहे. विदर्भात मात्र उन्हाचा कडाका कायम असून हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते. बुधवारपर्यंत (ता. ११) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात ‘असानी’चा प्रभाव
एकीकडे बंगालच्या उपसागरात ‘असानी’ या चक्रीवादळाची निर्मिती झाली, तर दुसरीकडे याच्या प्रभाव राज्यावर ही दिसून येत आहे. राज्यात ढगाळ वातावरणाची निर्मिती होत पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61817 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top