‘सांस्कृतिक ठेवा नष्ट करण्याचा डाव’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सांस्कृतिक ठेवा नष्ट करण्याचा डाव’
‘सांस्कृतिक ठेवा नष्ट करण्याचा डाव’

‘सांस्कृतिक ठेवा नष्ट करण्याचा डाव’

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या विरोधात आम आदमी पक्षाने सोमवारी (ता. ९) बालगंधर्व रंगमंदिर येथील चौकात आंदोलन केले. रंगमंदिराच्या पुनर्विकासाची प्रक्रिया पुणेकरांना अंधारात ठेवून राबविली जात असून, चार वर्षांनंतर अचानक प्रशासक आल्यानंतरच हा प्रस्ताव पुढे का आणला, असा प्रश्‍न ‘आप’ने उपस्थित केला आहे. ‘बालगंधर्व’ हा पुण्याचा सांस्कृतिक ठेवा आहे. पालकमंत्री अजित पवार आणि प्रशासक विक्रमकुमार यांनी हा ठेवा नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८ ला राष्ट्रवादी काँग्रेसने हे नाट्यगृह पाडण्यास विरोध केला होता, पण आता प्रशासकांना हाताशी धरून हा निर्णय घेतला आहे.

पुनर्विकासाच्या नावाखाली इतर नाट्यगृहांचा यापूर्वीच खेळखंडोबा झालेला आहे. रंगमंदिर पाडण्याची मागमी कोणी केली होती याची माहिती कलाकार, रसिकांना नाही. ही माहिती सार्वजनिक केली पाहिजे. सर्व प्रक्रिया पारदर्शकच झाली पाहिजे. तसेच नागरिकांना आणि कलाकारांची विश्वासात ही प्रक्रिया राबवावी अशी मागणी ‘आप’चे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली. पक्षाचे प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61819 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top