पोलिस आयुक्तांचा पुणेकरांशी ट्विटरसंवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस आयुक्तांचा पुणेकरांशी ट्विटरसंवाद
पोलिस आयुक्तांचा पुणेकरांशी ट्विटरसंवाद

पोलिस आयुक्तांचा पुणेकरांशी ट्विटरसंवाद

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : ‘‘मी मुंबईत राहतोय, आता दुसरीकडे राहण्याचा विचार सुरू आहे, माझा विचार बंगळूरला जावे वाटते, पण पत्नी म्हणते पुण्यालाच राहू, तुम्ही काय सुचवाल,’’ एका व्यक्तीने पोलिस आयुक्तांना हा प्रश्‍न विचारला. त्यावर ‘‘दोन्ही शहरे छान आहेत. पण नियमपुस्तिका सांगते, कायम बायकोचे ऐकले पाहिजे, प्रत्येकाप्रमाणे मलाही ते लागू आहे,’’ अशा नर्मविनोदी शैलीत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी उत्तर दिले. पुणेकरांनी विचारलेल्या अशा असंख्य प्रश्‍नांना पोलिस आयुक्तांनी तितक्‍याच दिलखुलासपणे व खास ‘पुणेरी शैली’त उत्तरे देत पुणेकरांची मने जिंकली! निमित्त होते पोलिस आयुक्तांचा पुणेकरांशी झालेला ट्विटरसंवाद!

पोलिस आयुक्त गुप्ता यांनी सोमवारी दुपारी एक ते सव्वादोन या वेळेत ‘पुणेकरांनो चला बोलूया’ या ट्विटरसंवादाचे आयोजन केले होते. या ‘ट्विटर लाईव्ह’ला नेटकऱ्यांनीही तितकाच दमदार प्रतिसाद दिला. सुमारे अडीचशेपेक्षा जास्त नागरिकांनी या वेळी पोलिस आयुक्तांना विविध प्रकारचे प्रश्‍न विचारले. त्यापैकी निवडक व महत्त्वाच्या ३५ ते ४० प्रश्‍नांना पोलिस आयुक्तांनी तितकीच नेमकी व मार्मिक उत्तरे दिली. सुमारे ४६९ जणांनी त्यांचे ट्विट रिट्विट करण्यास प्राधान्य दिले. विचारलेल्या प्रश्‍नांमध्ये वाहतूक समस्या, सायबर फसवणूक, महिलांबाबतच्या प्रश्‍नांची संख्या सर्वाधिक होती.

‘‘परराज्यातून पुण्यात शिक्षण, नोकरीसाठी आलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांच्या काय उपाययोजना आहेत,’’ ‘‘कधीतरी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तरी, वाहतूक पोलिस लगेच गाडीची चावी काढून दंड का आकारतात,’’ ‘‘पुण्यात हेल्मेटचा वापर का होत नाही,’’ ‘‘शहरात कायम ट्रॅफिकजॅममध्येच अडकण्याची वेळ का येते’’ अशा अनेक प्रश्‍नांपासून ते पती-पत्नीमधील भांडणे, आपापसातील भांडणे, पोलिसांकडून मिळणारी वागणूक असे विविध प्रश्‍न पोलिस आयुक्तांना विचारण्यात आले. महिलांच्या प्रश्‍नांसंदर्भात ‘‘विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी महाविद्यालयीन स्तरावर रॅगिंग समिती स्थापन करण्यात आली आहे. स्थानिक पोलिस व गुंडा स्क्वाडकडून नियमित पेट्रोलिंग केले जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी १०९० ही हेल्पलाइन उपलब्ध आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

६३१४३

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61826 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top