सिंहगडाची चढाई आता सुलभ होणार पूर्वीच्या तुलनेने रस्ता रुंद करणार ः प्रवाशांना बसण्यासाठी शेड उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंहगडाची चढाई आता सुलभ होणार

पूर्वीच्या तुलनेने रस्ता रुंद करणार ः प्रवाशांना बसण्यासाठी शेड उभारणार
सिंहगडाची चढाई आता सुलभ होणार पूर्वीच्या तुलनेने रस्ता रुंद करणार ः प्रवाशांना बसण्यासाठी शेड उभारणार

सिंहगडाची चढाई आता सुलभ होणार पूर्वीच्या तुलनेने रस्ता रुंद करणार ः प्रवाशांना बसण्यासाठी शेड उभारणार

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः पीएमपी बसची सिंहगडावरची चढाई आता अधिक सुलभ होणार आहे. कारण वन विभाग लवकरच बस वाहतुकीत अडथळा ठरणारा घाटातील रस्ता पूर्वीच्या तुलनेने अधिक रुंद करणार आहे. यात गडावरच्या पार्किंग जवळचा तीव्र वळणाचा देखील समावेश आहे. तोच सर्वात आधी रुंद केला जाईल. हे करीत असतानाच घाटात सायनेज व आरसे देखील लावले जातील. याचा फायदा बस चालकांना होणार आहे. तसेच घाटातील प्रवासी वाहतुकीसाठी अधिक कुशल चालकांची नेमणूक देखील केली जाईल.

पीएमपीने सिंहगडावर ई-बसची सेवा सुरू करून एक आठवडा झाला. यात आलेल्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी सोमवारी वन विभाग व पीएमपीची बैठक पार पडली. यात वन विभागाने रस्ता रुंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पीएमपी बसला गड चढण्यात येणाऱ्या अडचणी दूर होईल. हे करीत असताना पीएमपी देखील अन्य उपाययोजनांचा अवलंब करणार आहे.

प्रवाशांना बसण्यासाठी कव्हर शेड
प्रवाशांना बसण्यासाठी गडावर व पायथ्याशी कव्हर शेड उभारले जाणार आहे. येत्या आठवड्यात हा शेड उभारले जाईल. तसेच येथे पिण्याच्या पाण्याची सोय देखील केली जाणार आहे.

वेळापत्रक ठरणार, तो दोन्ही ठिकाणी लावणार
आता जसे प्रवासी येतात तशा गाड्या सोडल्या जातात. मात्र, आता प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपी गडावर जाण्याचे व गडावरून खाली येणाऱ्या बसचे वेळापत्रक तयार केले जात आहे. पायथ्याशी व गडावर दोन्ही ठिकाणी दर्शनी भागात ते वेळापत्रक लावले जातील. वाहतूक विभाग वेळापत्रक बनविण्याचे काम करीत आहे.

महिन्यांत पायथ्याला चार्जिंग स्टेशन
बसची वाहतूक चार्जिंग अभावी विस्कळीत होऊ नये, या करिता पायथ्याशी देखील चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. या ठिकाणी ३२० किलोवॅट क्षमतेचे स्टेशन असणार आहे. तसेच दोन डीसी चार्जेर असतील. त्यामुळे अवघ्या अर्धा तासांत बस चार्ज होईल. हे चार्जिंग स्टेशन एक महिन्याच्या आत उभारले जात आहे. त्यामुळे चार्जिंग अभावी बस सेवा बंद पडण्याच्या घटना होणार नाही.

पीएमपीची सिंहगडावरची बस वाहतूक अधिक सुलभ होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात आवश्यक त्या ठिकाणी रस्ता पूर्वीच्या तुलनेत थोडा मोठा करणे. चालकांच्या सोयीसाठी आरसे बसविणे केले जाईल. तसेच शेड देखील उभारले जाणार आहे.
-डॉ. चेतना केरुरे, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61829 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top