लक्ष्मीबाई अभ्यासिकेला प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मीबाई अभ्यासिकेला प्रारंभ
लक्ष्मीबाई अभ्यासिकेला प्रारंभ

लक्ष्मीबाई अभ्यासिकेला प्रारंभ

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संचलित लक्ष्मीबाई अभ्यासिकेचा प्रारंभ स्व-रुपवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने नुकताच झाला. तसेच, यावेळी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचेही अनावरण करण्यात आले. आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे सुमारे १२५ विद्यार्थी या अभ्यासिकेचा यावर्षी लाभ घेणार आहेत. दत्तमंदिर आणि दत्तभवन येथे झालेल्या कार्यक्रमाला श्री गिरनार संस्थानचे प्रमुख महंत सोमनाथ बापू उपस्थित होते. तसेच, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, दीपक मानकर, रघुनाथ येमूल गुरुजी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, शाहीर हेमंत मावळे, पियुष शाह, स्व-रुपवर्धिनीचे संजय तांबट, अजय कदम, चंदन हायगुंडे, विनोद मोरे, ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्‍वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख युवराज गाडवे, ज्येष्ठ विश्‍वस्त सुनील रुकारी, डॉ. पराग काळकर, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61835 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top