मिले सूर मेरा तुम्हारा’ने पं. भीमसेन यांच्या गायकीशी जोडले सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे प्रतिपादन; भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवाचे उदघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिले सूर मेरा तुम्हारा’ने पं. भीमसेन यांच्या गायकीशी जोडले

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे प्रतिपादन; भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवाचे उदघाटन
मिले सूर मेरा तुम्हारा’ने पं. भीमसेन यांच्या गायकीशी जोडले सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे प्रतिपादन; भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवाचे उदघाटन

मिले सूर मेरा तुम्हारा’ने पं. भीमसेन यांच्या गायकीशी जोडले सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचे प्रतिपादन; भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवाचे उदघाटन

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : ‘पं. भीमसेन जोशी यांचा आणि माझा समक्ष परिचय झाला नसला तरीही ‘मिले सूर मेरा तुम्हारा’च्या माध्यमातून ते असंख्य भारतीयांशी जोडले गेले. त्या भारतीयांपैकीच मी एक आहे’’, अशी भावना सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवा’च्या उदघाटनावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. उपेंद्र भट, पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र व शिष्य पं. श्रीनिवास जोशी, पं. प्रमोद गायकवाड, पं. शारंगधर साठे, शास्रीय गायिका सानिया पाटणकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे उपस्थित होते.
महोत्सवाची सुरुवात पं. प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन आणि पं. शारंगधर साठे यांच्या संवादिनी वादनाने झाली. त्यांना तबला साथ पं. अरविंद कुमार आझाद यांनी दिली. त्यानंतर पं. श्रीनिवास जोशी यांनी राग बिहागमधील रचना आणि ‘आता कोठे धावे मन’ हा अभंग सादर केला. त्यांना तबल्यावर साथ पांडुरंग पवार यांनी तर संवादिनीवर अविनाश दिघे यांनी साथ दिली. दुसऱ्या सत्रात जगविख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना बासरीवर वैष्णवी जोशी, सौरभ वर्तक आणि अमृता उप्रेती यांनी आणि तबल्यावर अनुतोष देघारिया यांनी साथ दिली. सानिया पाटणकर यांच्या गायनाने पहिल्या दिवसाची सांगता झाली. त्यांना तबल्यावर अजिंक्य जोशी, संवादिनीवर अभिनय रवंदे आणि तानपुऱ्यावर नितीन महाबळेश्वर, वेदवती परांजपे आणि ईश्वरी श्रीगार यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन नेहा परांजपे यांनी केली.
PNE22S63156

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61855 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top