रुधीर द लाइफ लाइनतर्फे गाण्यांचा कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुधीर द लाइफ लाइनतर्फे गाण्यांचा कार्यक्रम
रुधीर द लाइफ लाइनतर्फे गाण्यांचा कार्यक्रम

रुधीर द लाइफ लाइनतर्फे गाण्यांचा कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. १० : थॅलसेमिया दिनानिमित्त रुधीर द लाइफ लाइन व थॅलसेमिया सोसायटी ऑफ पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनचेंज्ड मेलडी – म्युझिकल इव्हिनिंग’ हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या पण संगीताची आवड असणाऱ्या प्रतिभावान डॉक्टर गायक व वादकांनी हा कार्यक्रम सादर केला.

या प्रसंगी थॅलसेमिया योद्धे, रुग्ण आणि पालक उपस्थित होते. या रुग्णांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने उपक्रम घेण्यात आला. आठ ते दहा महिने वय असलेल्या अनेक थॅलसेमिया रुग्णांना आयुष्यभर रक्त घेण्याची गरज असते. ‘रुधीर द लाइफ लाइन्स थॅलसेमिया डे-केअर’मध्ये रुग्णांसाठी मोफत रक्ताची सुविधा करण्यात आली आहे. यात कर्करोग तज्ज्ञ डॉ. अमित भट्ट, डॉ. अतुल कुलकर्णी, डॉ. श्वेता लुंकड, डॉ. लिझा बलसारा सहभागी झाले होते.
........

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61920 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top