
पुस्तकं, प्रवास आणि ट्रेकिंग
धमाल सुटीची
...................
पुस्तकं, प्रवास आणि ट्रेकिंग
......................................
नीला शर्मा
...............
मल्हार गुरव हा दहा वर्षांचा मुलगा प्रचंड वाचतो. सुटी असली की, त्याचं वाचन नेहमीपेक्षा जास्त वेळ चालतं.
बालसाहित्याबरोबरच मोठी माणसं वाचतात, त्या ऐतिहासिक कथा- कादंबऱ्या वाचनातही तो रमून जातो.
यंदाच्या सुटीत मल्हारने आतापर्यंत बरीच पुस्तकं वाचून, आता काय वाचायचं; त्याची यादी केली आहे. तो म्हणाला,
‘‘मी आता इयत्ता पाचवीत गेलो आहे. मी भरपूर वाचत असतो. वाचायला लागलो की, बाकीचं सगळं विसरतो. यावरून कधी कधी आई- बाबा ओरडतात, पण वाचायच्या नादात मला तेही ऐकू येत नाही. अलिकडेच मी वेगवेगळ्या रहस्यकथा वाचल्या. ऐतिहासिक विषयांवरची पुस्तक मला फार आवडतात. कान्होजी आंग्रेंवर मनोहर माळगावकरांनी लिहिलेलं आणि पुलंनी मराठीत भाषांतरीत केलेलं पुस्तक वाचताना मला अगदी तिथेच असल्यासारखं वाटत होतं.’’
मल्हारने पुढे सांगितलं की, मला ट्रेकिंग करायलाही आवडतं, पण काही वेळा त्यात भीतीसुद्धा वाटते. ती घालवण्यासाठी बाबांशी बोलतो. थोड्या दिवसांआधी बाबांनी त्यांच्या आणि मी माझ्या सायकलवरून एकत्र वीस किलोमीटरचा प्रवास केला. तो अनुभव मस्तच होता. एकदम भारी वाटलं.
--------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61931 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..