
डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी असंख्य संधी
डिजिटल मार्केटिंग हे आजमितीला भारतात सर्वांत जास्त मागणी असलेले करियर क्षेत्र आहे. ज्या झपाट्याने ऑनलाइन प्रक्रिया आणि ई-कॉमर्सचा प्रसार होत आहे; ते पाहता येत्या काही वर्षांत सर्वच गोष्टी डिजिटल होणार आहेत हे नक्की. दिवसागणिक या क्षेत्रात कुशल व्यक्तींची मागणी वाढत आहे. भविष्यात तर ही मागणी कैक पटींनी वाढेल.
दशकापूर्वी डिजिटल मार्केटिंगला फारसे महत्त्व आलेले नव्हते. परंतु, गेल्या काही वर्षांत डिजिटल क्षेत्रात क्रांती झाली आहे असे म्हटले, तर वावगे होणार नाही. आता कंपन्या, बँका, हॉस्पिटल, शाळा आदी सर्वच ठिकाणी डिजिटायझेशन झाले आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगलाही आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
डिजिटल मार्केटिंगमुळे ठराविक ग्राहकांपर्यंत कमीत कमी वेळेत आणि अचूक माहितीसह पोहोचता येते, त्यामुळे ग्राहकही आता डिजिटल मार्केटिंग या पद्धतीला सरावला आहे. डिजिटल मार्केटिंगमधील करिअर संधींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. एका सर्वेक्षणानुसार २०१६ मध्ये या क्षेत्रात दीड लाख नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या; तर २०१७ च्या पहिल्या तिमाहीतच अनेक उच्चांक मोडत या क्षेत्रात आठ लाख करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या. आता हा आलेख वाढतच आहे.
या क्षेत्रातील करियर संधींचे वैशिष्ट्य म्हणजे करिअरच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही शाखेचा उमेदवार डिजिटल मार्केटिंग शिकून घेऊन आकर्षक पॅकेज मिळवू शकतो. या क्षेत्रात सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, जाहिरात, डिजिटल मार्केटिंग अशा विविध विभागांचा समावेश असल्याने वेगवेगळी व्यक्तिगत कौशल्ये असलेल्या उमेदवारांनाही येथे अनेक संधी उपलब्ध आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61966 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..