एम्प्लॉयमेंट ऑफिसचा अमृत महोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एम्प्लॉयमेंट ऑफिसचा
अमृत महोत्सव उत्साहात
एम्प्लॉयमेंट ऑफिसचा अमृत महोत्सव उत्साहात

एम्प्लॉयमेंट ऑफिसचा अमृत महोत्सव उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. १० : रास्ता पेठ येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन (एम्प्लॉयमेंट ऑफिस) केंद्राचा अमृत महोत्सवी कार्यक्रम रविवारी (ता. ८) कार्यालयाच्या प्रांगणात दिमाखदार पद्धतीने साजरा झाला. या सोहळ्यामध्ये उपस्थित निवृत्त कर्मचाऱ्यांनी या कार्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे उद्घाटन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार यांच्या हस्ते झाले. उपायुक्त पवार म्हणाल्या, ‘‘४८१, रास्ता पेठ पुणे ही वास्तू देवालयासमान असून, तिची सदैव कृपादृष्टी मागील ७५ वर्षांपासून सर्वांच्या पाठीशी आहे. विविध स्थित्यंतरे पेलवत ही वास्तू अजूनही ठाम उभी आहे. विद्यमान आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची या वास्तूशी नाळ जुळलेली आहे. सेवायोजन कार्यालयाच्या कार्यपद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे पूर्वीपेक्षा कामकाजात आमूलाग्र बदल झाला आहे. नवीन पिढीने याचा उपयोग करून अधिक जोमाने व नैतिकतेने काम करून विभागाची प्रतिमा उंचवावी.’’

सहायक आयुक्त कविता जावळे म्हणाल्या की, आईच्या कुशीत आनंदी असतो, तसाच अनुभव या वास्तूमध्ये अनुभवला.
कार्यकारिणी समितीचे कार्यवाह अविनाश निकाळजे यांनी प्रास्ताविक केले.
या वेळी तुकाराम डगळे, मनीषा बेल्हे, प्रमोद बापट, अशोक पाटील, मनोहर पवार, मनोज ढेरंगे आदी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61992 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top