टोळक्याकडून तीन तरुणांवर कोयत्याने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोळक्याकडून तीन तरुणांवर कोयत्याने वार
टोळक्याकडून तीन तरुणांवर कोयत्याने वार

टोळक्याकडून तीन तरुणांवर कोयत्याने वार

sakal_logo
By

पुणे, ता. १० : रस्त्यावरून जाताना झालेल्या किरकोळ वादातून पोलिस वसाहतीमधील तीन तरुणांवर टोळक्‍याने कोयत्याने वार केले. जंगली महाराज रस्त्यावर झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात सोमवारी (ता. ९) रात्री ही घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात १८ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षद शांताराम शेटे (वय २१), विशाल शेटे (वय २५, दोघे रा. शिवाजीनगर पोलिस वसाहत), संकल्प मोरे (वय २६), या हल्ल्यात जखमी झाले आहेत. याप्रकरणी हर्षदने शिवाजीनगर दिली. जंगली महाराज रस्त्यावरील झाशी राणी चौकातून सोमवारी रात्री हर्षद, त्याचा भाऊ विशाल व मित्र संकल्प हे जात होते. त्यावेळी दुचाकीवरील दोघांशी त्यांचा किरकोळ वाद झाला. त्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास १८ ते १९ जण शिवाजीनगर पोलिस वसाहतीसमोरील रस्त्यावर आले. या टोळक्‍यातील काही जणांकडे धारदार शस्त्रे होती. त्यांनी हर्षद, विशाल, संकल्प यांना मारहाण करत त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62050 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top