वारज्यात महिलेचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारज्यात महिलेचा विनयभंग
वारज्यात महिलेचा विनयभंग

वारज्यात महिलेचा विनयभंग

sakal_logo
By

पुणे, ता. १० : पुष्पा चित्रपटातील गाणे म्हणून लज्जास्पद वर्तन करीत एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी स्वप्नील अरुण वांजळे (वय ३०, रा. रायगड कॉलनी, न्यू अहिरे गाव, वारजे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित महिलेने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार महिला सोमवारी (ता. ९) भाजी खरेदी करून वारजे-माळवाडी येथील रायगड कॉलनीतून जात होती. त्यावेळी वांजळे हा सोसायटीच्या परिसरात थांबला होता. त्याने या महिलेकडे पाहून पुष्पा चित्रपटातील गाणे म्हणण्यास सुरुवात केली. तसेच महिलेला पाहून लज्जास्पद वर्तन केले. त्यामुळे महिलेने वांजळेविरुद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62054 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top