विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उद्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उद्या
विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उद्या

विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उद्या

sakal_logo
By

पुणे, ता. १० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा यंदाचा पदवीप्रदान समारंभ येत्या गुरुवारी (ता. १२) सायंकाळी पाच वाजता विद्यापीठाच्या मागील बाजूस असणाऱ्या हिरवळीवर होणार आहे. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे (नॅक) अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली. २०२१ या शैक्षणिक वर्षातील पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पीएच.डी., एम.फील., अशा स्तरावरील एकूण एक लाख १८ हजार २२२ विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये ३०९ ‘पीएच.डी.’धारक आहेत. या प्रसंगी ७५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62064 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top