अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

क्षिरसागर ग्रंथालयाचा वर्धापन दिन साजरा
पुणे, ता. १० : वारजे येथील ग्रंथ मित्र विठ्ठल डोमाजी क्षिरसागर सार्वजनिक ग्रंथालयाचा वर्धापन नुकताचा साजरा करण्यात आला. या वेळी कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. ‘म्हाडा’चे अध्यक्ष विजय कोलते, काकासाहेब चव्हाण, सोपानराव पवार, प्रियांका चौधरी, गिरीश खत्री, प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार, माजी नगरसेवक किरण बारटक्के, सुरेश खांदवे आदी उपस्थित होते. दिलीप भिकुले, प्रभाकर पंडित, जयमल्हार वाचनालय काशीद, अभिनव सार्वजनिक वाचनालय पाबळ, नितीन बराटे यांना याप्रसंगी जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. सूत्रसंचालन चंद्रकांत कुंभार यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष नीलेश क्षिरसागर यांनी आभार मानले.


सोफोश संस्थेत बालिका दाखल
पुणे, ता. १० : बाल कल्याण समितीच्या आदेशाने सोफोश संस्थेत अवंतिका बालिकेला दाखल करण्यात आले आहे. या बालिकेच्या आईने यासाठी अर्ज केला होता. या मुलीची जन्मतारीख ०८ मे २०२१ असून तिचे वडील सागर थोरात हे बेपत्ता आहे. सोफोश संस्थेने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मिळूल आले नाही. मुलीचे वडील किंवा नातेवाईकांनी सोफोश संस्थेशी (दूरध्वनी क्र. ०२०२६१२४६६०/२६१२०७६२), बारामती पोलिस ठाण्यात किंवा बाल कल्याण समिती एक येरवडा येथे ३० दिवसांच्या आत संपर्क साधावा; अन्यथा या मुलीची संपूर्ण जबाबदारी संस्थेवर राहील व तिचे संस्थेमार्फत पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. PNE22S63313


दीपक लोया यांना पुरस्कार
पुणे, ता. १० : ‘लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ डि दोन’चे दीपक लोया यांनी ‘सर्वोत्कृष्ट रिजन चेयरपर्सन’ पुरस्कार पटकाविला आहे. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हेमंत नाईक, सी. ए. विवेक अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे झालेल्या मल्टिपल वार्षिक परिषदेत या पुरस्कारासाठी लोया यांची निवड करण्यात आली होती. राज्यातून ३५ रिजन चेयरपर्सन यांनी या स्पर्धेत भाग घेतला. लोया हे २० लायन्स क्लबसह पर्यावरण व सामाजिक कार्यात काम करत आहे.

PNE22S63323

चित्रकला अभिव्यक्त होण्याचे माध्यम : सोनवणे
पुणे, ता. १० : ‘‘कलेतून अभिव्यक्त होण्याची अनेक माध्यमे असून त्यामधील एक म्हणजे चित्रकला आहे,’’ असे मत दादासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केले. चित्रकार गणेश भालेराव यांनी रेखाटलेल्या क्रांतिकारी फकिरा या चित्राचे प्रकाशन नुकतेच झाले. या वेळी ते बोलत होते.
राजाभाऊ धडे, डॉ. सुहास नाईक, अमित शिंदे, सुजित रणदिवे आदी या वेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष माने यांनी केले. साहेबराव खंडाळे यांनी आभार मानले.

PNE22S63331

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62070 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top