
रॅप, लावणीचा विद्यार्थ्यांनी लुटला मनमुराद आनंद
पुणे, ता. १० : अलीकडच्या काळातील तरुणांना भावणारा ‘रॅप’ असो किंवा महाराष्ट्राचे लोकनृत्य लावणी, या दोन्ही कलांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. रॅप आणि त्यानंतर झालेल्या लावणीमुळे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
यिन-समर युथ समिट २०२२ मध्ये दुसऱ्यादिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या व्हिडिओ क्रिएटर, रॅपर यांच्याशी संवाद साधला. आत्ताच्या तरुणांना सोशल मीडियाची किती क्रेझ आहे, हे या सत्रातून स्पष्टपणे समोर आले. मग काय तुम्ही व्हिडिओ कसे तयार करता, रॅप बनवताना त्या मागील भूमिका काय?, असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थितांना विचारले. तसेच तंत्रज्ञान, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध विषयांवर मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा भविष्यात नक्कीच फायदा होईल, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. पुणे रॅपर्सचे ‘रॅप सॉंग’वरील बोल असुदेत किंवा अभिनेत्री माधुरी पवार हिची ठसकेबाज लावणी, अशा या आनंदमय, जल्लोष आणि ऊर्जेने संचारलेल्या वातावरणात युथ समिटची सांगता झाली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62113 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..