विमान प्रवासासाठी बनावट तिकिटांचा वापर केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमान प्रवासासाठी बनावट तिकिटांचा वापर केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
विमान प्रवासासाठी बनावट तिकिटांचा वापर केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

विमान प्रवासासाठी बनावट तिकिटांचा वापर केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः नामांकित विमान कंपनीची बनावट तिकिटे काढून ती खरी असल्याचे भासवून दोघांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी विमानतळ परिसरात घडली.

गौतम अरविंद शिंदे (वय २१, रा. गुलटेकडी ), महंमद अमान देसाई (वय २१, रा.कोंढवा ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी गुलझारी किशोरीलाल मीना (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे विमानतळावर सेवा बजावीत होते. त्यावेळी गौतम शिंदे व महंमद देसाई हे दोघेजण तेथे आले. त्यांनी विमानतळावर अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी एअर एशिया या विमान कंपनीची पुणे ते जयपूर या मार्गासाठीची मोबाईलवरील बनावट विमान तिकिटे तेथील अधिकाऱ्यांना दाखविली. हा फसवणुकीचा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी दोघांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. एन. लहाने करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62117 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top