नफ्याचे आमिष दाखवून ६१ लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नफ्याचे आमिष दाखवून ६१ लाखांची फसवणूक
नफ्याचे आमिष दाखवून ६१ लाखांची फसवणूक

नफ्याचे आमिष दाखवून ६१ लाखांची फसवणूक

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून दहा टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी एका व्यावसायिकाची तब्बल ६० लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

समर सक्‍सेना, अनुराग, अमित (पूर्ण नावे नाहीत) यांच्यासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अनिकेत सतीश देशपांडे (वय ३९, रा. औंध) यांनी चतृश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशपांडे हे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कार्यरत आहेत, तसेच ते शेअर मार्केटमध्येही गुंतवणुक करतात. ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांना गॅलॅक्सी ट्रेडर्स कंपनीच्या नावाने एका व्यक्तीने फोन केला. त्यांनी फिर्यादीस शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर फिर्यादीसमवेत वेळोवेळी काही व्यक्तींनी संपर्क साधून त्यांचा विश्‍वास संपादन केला. त्यामुळे फिर्यादी देशपांडे यांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे ऑनलाइन माध्यमाद्वारे ६० लाख ८८ हजार रुपये त्यांच्याकडे पाठविले. त्यानंतर फिर्यादी देशपांडे यांना कोणत्याही प्रकारचा परतावा किंवा १० टक्के नफा देण्यात आला नाही. फिर्यादी यांनी त्यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. या प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62122 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top