
पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये आता फ्लेमलेस पॅन्ट्रीकार
पुणे, ता. १० : पुणे-दानापूर रेल्वेचा प्रवास आता केवळ आरमादायकच नाही तर अधिक सुरक्षित होणार आहे. कारण आता या रेल्वेला नवीन एलएचबीचा रेक जोडण्यात आला आहे. इतकेच नाही तर पॅन्ट्रीकार मधून गॅसशेगड्या काढून त्याजागी इंडक्शन हीटिंग बसविण्यात आले आहे. यामुळे रेल्वेगाड्यांना आग लागण्याच्या घटनादेखील कमी होण्यास मदत होणार आहे. इंडक्शन हीटिंग असलेली ही पुणे विभागातील पहिली रेल्वे आहे.
गेल्या काही दिवसांत देशांत विविध ठिकाणी धावत्या रेल्वेला आग लागण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. यासाठी अनेक बाबी जरी कारणीभूत असल्या तरी पॅन्ट्रीतील गॅसमुळेदेखील मोठा धोका उद्भवतो. हे लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने गॅस काढून त्याजागी इंडक्शन हीटिंगचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गॅसचा वापर पूर्णपणे बंद होण्यास मदत होऊन रेल्वेप्रवासही अधिक सुरक्षित होणार आहे. यासह या गाडीला हेड-ऑन जनरेशन ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे डब्यांतील एलईडी दिवे, पंखे आणि एअर कंडिशनर यांसारख्या विद्युत उपकरणांना वीजपुरवठा केला जातो. या रेकमध्ये डिझेलवर चालणाऱ्या पॉवर-कार आता वापरल्या जात नाहीत, त्यामुळे ऊर्जेची बचत होते व ध्वनिप्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनही कमी होण्यास मदत होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62129 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..