‘जीआयईएआयए’ची नविन कार्यकारिणी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जीआयईएआयए’ची नविन कार्यकारिणी जाहीर
‘जीआयईएआयए’ची नविन कार्यकारिणी जाहीर

‘जीआयईएआयए’ची नविन कार्यकारिणी जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः सरकारी विमा उद्योगातील कर्मचाऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या जनरल इंशुरन्स एम्प्लॉईज ऑल इंडिया असोसिएशनचे (जीआयईएआयए, प.वि) अधिवेशन नुकतेच पुण्यात झाले. या अधिवेशनात ‘जीआयईएआयए’ची नविन कार्यकारिणी जाहीर झाली. त्यामध्ये प्रदीप धरमठोक यांची अध्यक्षपदी, महासचिव म्हणून प्रशांत दीक्षित, सचिवपदी जितेंद्र इंगळे आदींची निवड करण्यात आली. अधिवेशनात पाच राज्यांमधील १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या त्रैवार्षिक अधिवेशनात विमा कर्मचाऱ्यांच्या गेल्या ५६ महिन्यांपासून दुर्लक्षित असलेल्या वेतन कराराच्या मागणीबरोबर, चार सरकारी विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करणे, १९९५ची निवृत्ती योजना सर्व नविन कर्मचाऱ्यांनाही लागू करणे आदी ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62134 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top