
सासू व दीराचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला
पुणे, ता. १० : लग्नात मानपान केले नाही, हुंडा दिला नाही म्हणून गर्भवती सुनेकडे पैसे व सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. तसेच तिला शारीरिक व मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू व दिराचा अटकपूर्व जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांनी हा आदेश दिला.
सपना मदन कानडे (वय ५७) आणि अरुण मदन कानडे (वय २६) अशी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेल्यांची नावे आहेत. दिव्या तरुण कानडे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिच्या वडिलांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती तरुण मदन कानडे (वय २९) आणि सासरा मदन धोंडिबा कानडे (६२, सर्व रा. हांडेवाडी रस्ता) यांच्यासह सासू व दीराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पती व सासऱ्याला अटक केली असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. ही घटना २५ एप्रिल रोजी हांडेवाडी रस्त्यावरील एका सोसायटीत घडली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या सासू आणि दीराने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी या अर्जाला विरोध केला.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62140 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..