रक्तदान शिबिर: तुटवडा निर्माण होण्याची शक्यता पुण्यात रक्तदात्यांची संख्या घटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्तदान शिबिर: तुटवडा निर्माण होण्याची शक्यता
पुण्यात रक्तदात्यांची संख्या घटली
रक्तदान शिबिर: तुटवडा निर्माण होण्याची शक्यता पुण्यात रक्तदात्यांची संख्या घटली

रक्तदान शिबिर: तुटवडा निर्माण होण्याची शक्यता पुण्यात रक्तदात्यांची संख्या घटली

sakal_logo
By

पुणे, ता. १० : उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्याने रक्तदानाचे प्रमाण घटल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे मे महिन्याच्या मध्यानंतर काही रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

शहरात उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे महाविद्यालयांमध्ये होणारे रक्तदान शिबिर बंद आहेत. कोरोनानंतर दोन वर्षांमध्ये प्रथमच कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे नोकरदार मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. त्याचा थेट परिणाम रक्तदानाचे प्रमाण घटण्यावर झाल्याचे निरीक्षण आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. गणपती मंडळे, ढोल-ताशा पथके यांच्याकडून रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. त्यांनी आता पुढे येऊन या शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन आरोग्य क्षेत्रातून करण्यात आले आहे.


असा झाला परिणाम
-माहिती तंत्रज्ञानासह विविध कंपन्यांमधून नियमित रक्तसंकलन होते. पण अद्यापही अनेक कंपन्या पूर्णवेळ सुरू झाल्या नाहीत. त्याचा फटका रक्तदान शिबिरांना बसत आहे.
-औद्योगिक वसाहतींमधून होणाऱ्या रक्तदान शिबिरांना सध्या प्रतिसाद मिळत आहे. पण, तेथेही केवळ मे महिन्याच्या मध्यावधीपर्यंत शिबिरे नियोजित आहेत.
- रक्तदानात महाविद्यालयांचे नेहमीच योगदान असते. मात्र, सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने महाविद्यालये व विद्यापीठे बंद असल्याने शिबिरांची संख्या कमी झाली आहे.

शहरातील रक्तपेढ्या : २५
दररोज रक्ताची गरज : ६०० ते १००० बॅग्ज

यंदा मे महिन्याच्या सुरुवातीला सुदैवाने रक्तदान शिबिरे झाली. त्यातून या महिन्याच्या मध्यावधीपर्यंत पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र, त्यानंतर शिबिरांचे अजून नियोजन झाले नाही. त्यामुळे रक्तसाठ्याचा अंदाज अजून येत नाही.
- डॉ. अतुल कुलकर्णी, कार्यकारी संचालक, जनकल्याण रक्तपेढी, पुणे

कोरोना उद्रेकात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रक्तसाठ्याची स्थिती चांगली आहे. मागणीप्रमाणे रक्तपुरवठा करता येत आहे.
- डॉ. स्मिता जोशी, रक्तपेढी प्रमुख, सह्याद्री रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62146 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top