रेसिडेन्सी क्‍लब चोरीप्रकरणी एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेसिडेन्सी क्‍लब चोरीप्रकरणी एकास अटक
रेसिडेन्सी क्‍लब चोरीप्रकरणी एकास अटक

रेसिडेन्सी क्‍लब चोरीप्रकरणी एकास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः लग्न सोहळ्यात फोटो काढण्यासाठी स्टेजवर गेलेल्या वधुच्या भावाकडील पाच लाखाच्या रोख रकमेसह दागिने चोरुन नेणाऱ्या चोरट्यास अखेर कोरेगाव पार्क पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना ३ मे रोजी रात्री साडे दहा वाजता क्वीन्स गार्डन परिसरातील रेसिडेन्सी क्‍लब येथे घडली होती.

जॉन सॅम्युअल पंडित (वय ५८, रा. काकडे वस्ती, कोंढवा बुद्रुक, मुळ रा. मंगळवार पेठ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संगणक अभियंत्याने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास बॅग चोरीस गेली. बॅगेमध्ये लग्नकार्यात खर्च करण्यासाठी ठेवलेली साडे पाच लाख रुपयांची रोख रक्कम, आहेराची पाकिटे, सोन्याचे दागिने, मोबाईल, बॅंकेचे कार्ड, वरासाठी केलेले दागिने असा ऐवज होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी तपास सुरु केला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके व त्यांच्या पथकाने लग्नातील व्हिडिओ चित्रीकरण तपासले. त्यामध्ये त्यांना संशयित व्यक्तीचे फोटो प्राप्त झाले. त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिनेश शिंदे, नामदेव खिलारे, पोलिस कर्मचारी बालाजी घोडके, संदीप जढर, विशाल गाडे,अझरुद्दीन पठाण, संदीप गर्जे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62151 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top