पुण्यात उन्हाच्या झळा होणार कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात उन्हाच्या झळा होणार कमी
पुण्यात उन्हाच्या झळा होणार कमी

पुण्यात उन्हाच्या झळा होणार कमी

sakal_logo
By

पुणे, ता. १० : उन्हाच्या तापदायक झळांपासून आता पुणेकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे व परिसरात कमाल तापमानात घट होताना दिसत आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस शहर परिसरात ढगाळ वातावरणाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

गेल्या तीन दिवसांपसान शहरात अधून-मधून ढगाळ वातावरणाचे सावट पाहायला मिळत आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा देखील घसरू लागला आहे. असे असले तरी किमान तापमानाचा पारा वाढत असून उकाडा कायम आहे. शहरात मंगळवारी ३७.७ अंश सेल्सिअस कमाल, तर २५.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मार्च आणि एप्रिल महिना पुणेकरांसाठी अक्षरशः तापदायक ठरला. उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना मात्र आता मे महिन्यात उन्हाच्या चटक्यांपासून थोडासा दिलासा मिळणार आहे. शहर आणि परिसरात येत्या रविवारपर्यंत (ता. १५) ढगाळ वातावरणाची शक्यता असून यामुळे कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांच्या खाली राहण्याची शक्यता आहे.

शहरात कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
८ एप्रिल ः ४०.७
९ एप्रिल ः ३८.६
१० एप्रिल ः ३७.७

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62153 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top