गृहनिर्माण सोसायट्यांनी डीम्ड कन्व्हेयन्स न केल्यास अडचणीचे ठरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गृहनिर्माण सोसायट्यांनी डीम्ड कन्व्हेयन्स न केल्यास अडचणीचे ठरणार
गृहनिर्माण सोसायट्यांनी डीम्ड कन्व्हेयन्स न केल्यास अडचणीचे ठरणार

गृहनिर्माण सोसायट्यांनी डीम्ड कन्व्हेयन्स न केल्यास अडचणीचे ठरणार

sakal_logo
By

गृहनिर्माण सोसायट्यांसाठी डीम्ड कन्व्हेयन्स आवश्यक
सहकार आयुक्त अनिल कवडे यांचे प्रतिपादन; सुवर्णमहोत्सवी सहकार दरबार

पुणे, ता. १० : राज्यातील सुमारे निम्म्याहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांच्या नावावर जमीन नाही. ही बाब भविष्यात सभासदांना पुनर्विकास आणि इतर बाबींसाठी अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे सोसायट्यांनी कन्व्हेयन्स किंवा डीम्ड कन्व्हेयन्स (मानीव अभिहस्तांतरण) करून घ्यावे, असे आवाहन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले, तसेच सभासदांनी स्वयंशिस्त पाळण्यासोबतच सोसायटी तंटामुक्त कशी राहील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

पुणे जिल्हा को-ऑप. हाउसिंग अँड अपार्टमेंट्स फेडरेशनच्या पिंपळे सौदागर शाखेच्या वतीने ‘सहकार दरबारा’चा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, पिंपरी चिंचवड उपनिबंधक नवनाथ अनपट आदी या वेळी उपस्थित होते.

कवडे म्हणाले, ‘‘गृहनिर्माण सोसायट्यांनी उपविधी तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे गरजेचे आहे. सहकाराचे सूत्र कोणीही विसरू नये. पदाधिकाऱ्यांनी आपले काम निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समाजसेवेच्या दृष्टिकोनातून करावे, तसेच सोसायटीतील सभासदांनीही पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आदर करावा.’’

फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी फेडरेशनच्या कार्याचा आढावा घेतला. महावितरणचे सहायक अभियंता सुजित ननावरे यांनी वीजपुरवठ्याशी संबंधित प्रश्नांना उत्तरे दिली.
आयुक्त कवडे यांच्या हस्ते सुभाष ढवळे, अनिल असगेकर आणि अधिवक्ता ज्योत्स्ना जोशी यांचा सहकार दरबारातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. महासंघाचे पिंपळे सौदागरचे प्रमुख चारुहास कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्त उपनिबंधक राजेंद्र पवार यांनी सहकार दरबारचा समारोप केला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62157 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top