आरोग्य भरतीतील ‘ड’ वर्गाची पुन्हा परीक्षा घेणार : राजेश टोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य भरतीतील ‘ड’ वर्गाची पुन्हा परीक्षा घेणार : राजेश टोपे
आरोग्य भरतीतील ‘ड’ वर्गाची पुन्हा परीक्षा घेणार : राजेश टोपे

आरोग्य भरतीतील ‘ड’ वर्गाची पुन्हा परीक्षा घेणार : राजेश टोपे

sakal_logo
By

पुणे, ता. १० : ‘‘आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ वर्गाचा पेपर पूर्ण ‘व्हायरल’ झाला होता. त्यामुळे ‘ड’ वर्गाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यासोबत चर्चा झाली असून परीक्षेचा निर्णय लवकर घेऊ,’’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा पंधरावा वर्धापनदिन आणि सिंबायोसिस स्किल ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात टोपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना टोपे यांनी ही माहिती दिली.
टोपे म्हणाले,‘‘कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरी ते प्रमाण कमी आहे. कोरोनाची चौथी लाट असल्याचे सूतोवाच नाही. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे येथे रुग्ण संख्या थोडी वाढली आहे. पण त्यात रुग्ण गंभीर नाहीत. रुग्ण संख्या वाढलेल्या राज्यातील आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. परंतु त्यातही रुग्ण संख्या वाढली, तरी सौम्य लक्षण असतील असा अनुमान काढण्यात आला आहे.’’ पुण्यातील किडनी रॅकेट संदर्भात न्यायालयीन सुनावणी सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ‘‘सिटी स्कॅन आणि एमआरआय याठिकाणी जाऊन फोटो काढणे ही पद्धत कोठेही पाहिली नाही. अशा पद्धतीने रुग्णालयाला अंधारात ठेवून कोणी दुसऱ्याने फोटो काढले असतील तर ते चुकीचे आहे.’’, असेही स्पष्ट मतही टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62160 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top