गट ‘ड’ची पुन्हा परीक्षा घेणार : टोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गट ‘ड’ची पुन्हा परीक्षा घेणार : टोपे
गट ‘ड’ची पुन्हा परीक्षा घेणार : टोपे

गट ‘ड’ची पुन्हा परीक्षा घेणार : टोपे

sakal_logo
By

पुणे, ता. १० : ‘‘आरोग्य भरतीतील पेपर फुटीसंदर्भात विधिमंडळ अधिवेशनात चर्चा होऊन पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासंदर्भाने पोलिसांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. आरोग्य विभागाच्या गट ‘ड’चा पेपर पूर्ण ‘व्हायरल’ झाला होता. त्यामुळे ‘ड’ वर्गाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली आहे,’’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा पंधरावा वर्धापनदिन आणि सिंबायोसिस स्किल ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात टोपे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना टोपे यांनी ही माहिती दिली. संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘सिंबायोसिस’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, कुलगुरू डॉ. अश्विनीकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
टोपे म्हणाले,‘‘कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरी ते प्रमाण कमी आहे. कोरोनाची चौथी लाट असल्याचे सूतोवाच नाही. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे येथे रुग्ण संख्या थोडी वाढली आहे. पण त्यात रुग्ण गंभीर नाही. रुग्ण संख्या वाढलेल्या राज्यातील आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. परंतु त्यातही रुग्ण संख्या वाढली, तरी सौम्य लक्षण असतील असे अनुमान काढण्यात आले आहे.’’
पुण्यातील किडनी रॅकेट संदर्भात न्यायालयीन सुनावणी सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ‘‘सिटी स्कॅन आणि एमआरआय याठिकाणी जाऊन फोटो काढणे ही पद्धत कोठेही पाहिली नाही. अशा पद्धतीने रुग्णालयाला अंधारात ठेवून कोणी दुसऱ्याने फोटो काढले असतील तर ते चुकीचे आहे.’’, असेही स्पष्ट मतही टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. या विद्यापीठातर्फे गृहिणी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त प्रशिक्षण देण्यात येते, असे डॉ. स्वाती मुजूमदार यांनी वर्धापनदिन सोहळ्यात सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62160 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top