फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यास अटक
फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यास अटक

फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १० : टिकटॉकद्वारे ओळख झालेल्या तरुणीशी मैत्रीचे संबंध निर्माण झाल्यानंतर तिने लग्नास नकार दिल्याने तरुणाने तिचे फोटो कुटुंबीयांना पाठविले. तसेच तरुणीचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चंदननगर पोलिसांनी तरुणास बेड्या ठोकल्या. अब्दुल वहीद शेख (वय २०, रा. माळीवाडा, पाचपीर चावडी, नगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, तरुणीने या प्रकरणाबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. सायबर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून चंदननगर पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग केले. त्यानुसार, चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी शेख याच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल केला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62165 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top