राज्यात उन्हाचा चटका वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात उन्हाचा चटका वाढला
राज्यात उन्हाचा चटका वाढला

राज्यात उन्हाचा चटका वाढला

sakal_logo
By

पुणे, ता. १०: राज्यात काही ठिकाणी उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असून काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी बुधवारी (ता. ११) उष्णतेची लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
राज्यात मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५ अंश सेल्सिअस, तर नीचांकी तापमान २०.४ अंश सेल्सिअस महाबळेश्‍वर येथे नोंदले गेले. उत्तर महाराष्ट्रात नगर व जळगाव,
तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आली. वाशीम, वर्धा, चंद्रपूर, भागात पारा ४४ अंशांच्या पुढे होता. ही स्थिती अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या ‘असानी’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असून काही भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक भागात ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उष्ण लाट येऊ शकते. कोकणात मात्र येत्या शुक्रवारपर्यंत (ता. १३) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर मात्र संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.


येथे सर्वाधिक तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अकोला ः ४५
जळगाव ः ४४.५
वर्धा ः ४४.५
बुलढाणा ः ४४.२
चंद्रपूर ः ४४.२
वाशीम ः ४४
मालेगाव ः ४३.४
अमरावती ः ४३.६

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62166 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top