
आंतरराष्ट्रीय लवादामध्ये करियरच्या विविध संधी भारती विद्यापीठातील चर्चासत्रातील सूर
पुणे, ता. १० : विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय लवादामध्ये प्रॅक्टिस करून करिअर करण्यासाठी एक चांगली संधी आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी गांभीर्यांचा विचार करावा, असा सूर ‘आंतरराष्ट्रीय लवाद संवाद : २०२२’ या चर्चासत्रामध्ये उमटला.
भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या ‘न्यू लॉ कॉलेज’मधील ‘मध्यस्थ सेल’च्यावतीने या दोन दिवशीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने हे चर्चासत्र पार पडले.
पहिल्या दिवशीच्या सत्रात ‘आणीबाणी लवाद’ आणि ‘वाद निवळणे हे पर्यावरण विरुद्ध एक गुंतवणूक नाही’ या विषयावर चर्चा झाली. त्यात नीती सचदेवा, तारिक खान, शलाका पाटील, मयांक अरोरा, चिराग बल्ल्यानं, नेवेना जेरेमोविच, कार्तिकेय महाजन, अक्षय श्रीधर, आंद्रीस स्चरगेनबर्गर, इपेक इनकि यांनी सहभाग घेतला होता.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रात ‘दिवाळखोरी व लवाद’ आणि ‘लवाद करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर चर्चासत्र होते. त्यात जयंत भट्ट, अधीश शर्मा, रॉबर्ट हेअथ (मेलबर्न), अंकुश मेहता, प्रत्युष मिंगलानी, स्वेनज वचटेल आणि कॅरोलिना मौरा यांनी सहभाग घेतला. चर्चासत्राचे समन्वयन प्रा. शिवांगी सिन्हा यांनी केले. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. उज्ज्वला बेंडाळे यांनी मार्गदर्शन केले.
या चर्चासत्रामध्ये कायद्याच्या विद्यार्थी सहभागी झाले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62169 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..