
पीएमपीचा बसथांबा आता बांबूचा ,प्रायोगिक तत्वावर सिंहगडावर उभारणार
पीएमपी बसथांबा आता बांबूचा!
प्रायोगिक तत्वावर सिंहगडाची निवड; तीस वर्षांचे आयुर्मान
पुणे, ता. ११ ः पीएमपी प्रशासन आता बसथांब्यासाठी बांबूचा वापर करणार आहे. प्रायोगिक तत्वावर सिंहगडाच्या पायथ्याशी व गडावर अशा दोन्ही ठिकाणी बाबूंचा बसथांबा असणार आहे. लवकरच या कामास सुरुवात होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बांबू बसथांब्यासाठी सुमारे लाख ते दीड लाख रुपयांपर्यतचा खर्च अपेक्षित असून, त्याचे आयुर्मान ३० वर्षांचे असणार आहे. ‘नियॉम’ ही संस्था पीएमपीसाठी बसथांबा उभारणार आहे.
------------------
बावीस हजार प्रवाशांची भेट
२ मे पासून सिंहगडावर पीएमपीची बससेवा सुरू झाली. एका आठवड्यात सुमारे वीस ते बावीस हजार प्रवाशांनी बस सेवेचा लाभ घेतला आहे. रविवारी प्रवासी संख्या ५ हजार इतकी झाली होती. त्यामुळे आता पीएमपी प्रशासनाने दर रविवारी २५ इ-बसेस सिंहगडावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
-------------------
कोट :
- पीएमपी दोन ठिकाणी प्रायोगिक तत्वांवर पूर्णपणे बांबूचा वापर केलेला बसथांबा उभे करीत आहे. त्याला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहूनच अन्य ठिकाणी बांबूद्वारे बसथांबा बांधायचा की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल. - डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62170 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..