
बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची नागरीकांची मागणी
ही बातमी बुधवारी टुडेमध्ये वापरावी.
सकाळ वृत्तसेवा
पुणे,ता. १० : औंध येथील तेजस्वीनी सोसायटीतील ओपन स्पेसवर केलेले अनधिकृत बांधकाम पाडावे, याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप या सोसायटीतील रहिवाशांनी केला आहे. तातडीने याची दखल घेऊन महापालिकेने त्यावर कारवाई करावी, अशी मागणीही तेथील रहिवाशांनी केली आहे.
औंध येथील सर्व्हे नंबर २४२ वर पन्नास प्लॉटची स्वतंत्र सोसायटी आहे. या सोसायटीच्या पूर्वेला ओपन स्पेस सोडली आहे. तेथून औंध-बाणेर २४ मीटर रूंदीचा रस्ता जातो. या ओपन स्पेसवर बेकायदेशीरपणे ओटा आणि सहा शेड्स उभारण्यात आल्या आहेत. हे सर्व बांधकाम रस्त्यावरही आल्याने रस्त्याची रूंदी निम्याने कमी झाली आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूकीची कोंडी होते. तसेच अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील त्यांची दखल घेतली जात नाही, अशी तक्रार तेथील रहिवाशांनी केल आहे.
----------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62172 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..