सुधीर आल्हाटवर खंडणीचा आणखी एक गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधीर आल्हाटवर खंडणीचा आणखी एक गुन्हा
सुधीर आल्हाटवर खंडणीचा आणखी एक गुन्हा

सुधीर आल्हाटवर खंडणीचा आणखी एक गुन्हा

sakal_logo
By

पुणे, ता. १०ः गुंठेवारीची बोगस कागदपत्रे तयार करून बांधकाम व्यावसायिकास बांधकाम पाडण्याची धमकी देऊन त्याच्याकडून ८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाट व त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. आल्हाट व त्याच्या साथीदारांविरुद्ध यापुर्वीही विविध पोलिस ठाण्यांत तीन गुन्हे दाखल आहेत.

सुधीर आल्हाट, रोहन दिनेश समुद्र, दिनेश विद्याधर समुद्र, रवी वानगे यांच्यासह एका महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रसाद मोहन मोरे (वय ३३, रा. हडपसर) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडगाव बुद्रुकमधील जाधवनगर येथील एका व्यक्तीची जागा समुद्र कुटुंबीयांसमवेत विकसनासाठी घेतली होती. मात्र समुद्र यांच्याकडून संबंधित जागेवर यापूर्वीच बांधकाम सुरू होते. याबाबतीच सर्व कागदपत्रे त्यांनी तयार केली होती. त्यानंतर ही जागा विकसित करण्यासाठी फिर्यादी मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांना भागीदार करून घेण्यात आले. त्यानंतर समुद्र या भागीदारीतुन बाहेर पडले. त्यानंतर त्याच कागदपत्रांचा वापर करून आणि माहिती अधिकार कार्यकर्ता अल्हाट याच्याशी संगनमत करून त्यांनी फिर्यादीकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, संशयित आरोपींनी महानगरपालिकेत तक्रारी अर्ज करून बनावट गुंठेवारी प्रतीच्या आधारे फिर्यादी मोरे यांना बांधकाम पाडण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. प्रारंभी फिर्यादी यांनी त्यांना पाच लाख रुपये दिले. त्यानंतर आणखी २ लाख ५० हजार आणि पुन्हा ५० हजार रुपये गुगल पे द्वारे त्यांच्याकडून घेतले. असे वेळोवेळी आठ लाख रुपयांची रक्कम त्यांनी फिर्यादीकडून घेतली

न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे खोटे तक्रार अर्ज करून निलंबन झालेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाकडून ५० लाख रुपयांची खंडणी आल्हाट व त्याच्या साथीदारांनी मागितली होती. त्यापैकी २५ लाख रुपयांची खंडणी आल्हाट व त्याच्या साथीदारांनी उकळली होती. याप्रकरणी त्याच्यासह ७ जणांवर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मागील महिन्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा न्यायालयाच्या आदेशाने दुसरा गुन्हाही दाखल झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62193 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top