
दौंड डेमूसह २५ रेल्वे १७ दिवसांसाठी रद्द
पुणे, ता.१० ः दौंड रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये आरओबी (रोड अंडर ब्रिज ) बांधण्याचे काम १३ ते २७ मे दरम्यान चालणार आहे. यासाठी तब्बल १७ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे स्थानकावरून धावणाऱ्या सुमारे २५ रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका पुणे -दौंड दरम्यान डेमूने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.
पुणे -दौंड डेमू, दौड -बारामती, हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे -भुसावळ एक्स्प्रेस आदी रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात गाड्यांना गर्दी असताना रेल्वे प्रशासनाने गाड्या रद्द केल्या आहेत. ज्या प्रवाशांनी चार महिने आधी तिकिटाचे आरक्षण करून ठेवले आहे. अशांना याचा मोठा फटका बसणार आहे. गाड्या रद्द करून रेल्वेने प्रवाशांना चांगलाच ‘घाम’ काढला आहे.
या गाड्या रद्द
पंढरपूर-दादर एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे डेमू , मुंबई- पंढरपूर एक्स्प्रेस, पुणे-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, दौंड-पुणे डेमू , दौंड-पुणे शटल, बारामती-पुणे डेमू , पुणे- बारामती डेमू, सोलापूर- पुणे हुतात्मा एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस,पुणे-सोलापूर डेमू, पुणे-भुसावळ स्पेशल,पुणे-निजामाबाद डेमू, निजामाबाद-पंढरपूर डेमू
या गाड्या अंशिक रद्द
इंदूर-दौंड एक्स्प्रेस पुणे स्थानका पर्यत धावेल.
दौंड-ग्वाल्हेर एक्स्प्रेस पुणे स्थानकापर्यत धावेल.
हैद्राबाद-हडपसर एक्स्प्रेस बार्शी टाऊन स्थानकापर्यंत धावेल.
बेंगलोर-मुंबई उद्यान एक्स्प्रेस सोलापूर स्थानकापर्यंत धावेल.
नांदेड-पनवेल एक्स्प्रेस कुर्डुवाडी स्थानकापर्यंत धावेल.
या गाड्या कुर्डुवाडी, मिरज पुणे मार्गे धावणार
१. विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस
२. काकिनाडा पोर्ट- लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस
३. मुंबई- नागरकोईल -मुंबई एक्स्प्रेस
४. पुणे- भुवनेश्वर एक्स्प्रेस
५. लोकमान्य टिळक टर्मिनल – कराईकल एक्स्प्रेस
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62201 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..