सेवापूर्ती : एका समाजाभिमुख अधिकाऱ्याची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवापूर्ती : एका समाजाभिमुख अधिकाऱ्याची
सेवापूर्ती : एका समाजाभिमुख अधिकाऱ्याची

सेवापूर्ती : एका समाजाभिमुख अधिकाऱ्याची

sakal_logo
By

सामाजिक जाण व भान सतत जागृत ठेवून समाजात सातत्याने समाजाभिमुख काम करणारा, माणसे जोडणारा, प्रशासकीय सेवेत कोणतीही तडजोड न करता पुणे महापालिकेला ‘दैवत’ मानून नागरिकांची सेवा हे ‘कर्तव्य’ समजून प्रत्येकाला योग्य सल्ला देत, मदतीचा हात देत पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक आपली ३८ वर्षांची सेवा ही ३० एप्रिल २०२२ रोजी पूर्ण केली. ‘कनिष्ठ अभियंता ते अतिरिक्त आयुक्त’ हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. कष्ट, चिकाटी, निष्ठेने केलेले प्रामाणिकपणे काम यामुळे बढती मिळण्याची संधी उपलब्ध झाली. हे मी सारं गेल्या ३० वर्षांपासून चळवळीतील मित्र म्हणून जवळून पाहत आलोय.

ज्या-ज्या विभागात कामाची संधी मिळाली, तेथे त्यांनी मनापासून काम केले. कनिष्ठ अभियंता म्हणून काम करताना पथ, बांधकाम व गलिच्छ वस्ती निर्मूलन इ. विभागात काम केले. रस्ता ही जीवनवाहिनी समजली जाते. पथ विभागात काम करताना नवीन रस्ते बनवताना शहर जोडले जात असल्याचा प्रचंड आनंद घेतला. त्यांनी स्वतःला ‘रोड किंग’ समजत पूर्ण पुणे शहरभर टू व्हीलरवर रोजचे १०० ते १५० किमी प्रवास केला. कोणतेही काम करताना नियमात तडजोड केली नाही हे मोळकांचे वैशिष्ट्य.

गलिच्छ वस्ती निर्मूलन विभागात काम करताना शहराची खरी ओळख त्यांना झाली. दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रश्न व समस्या समजून घेणे जड गेले नाही, कारण ते स्वतः प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडायचा प्रयत्न शिक्षणाच्या जोरावर करत होते. भूमिहीन शेतमजुराचा मुलगा म्हणून गरीबीशी त्यांची जोडलेली नाळ कधीच तुटली नाही. वाचनाची प्रचंड आवड असल्याने महापुरूषांना समजून घेऊन त्यांचे विचार स्वतःच्या जीवनात अमलात आणायचा सातत्याने प्रयत्न केला. स्वतःला सतत घडवत समाजाशी असलेली नाळ अधिक घट्ट होत गेली, त्यामुळेच मनपातील सर्व कर्मचाऱ्यांपासून ते सामान्य नागरिकांनाही हा अधिकारी आपला वाटत गेला.

सह आयुक्तपदी काम करताना वेगवेगळे झोन, नागरवस्ती, एलबीटी, घनकचरा, करआकारणी व भांडार विभागात यांनी काम केले. सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड असल्याने नागरवस्ती विभागात काम करण्याचा खूप आनंद घेतला. स्त्रीवादी विचार समजून घेतल्याने सामाजिक प्रश्न व विशेषतः महिलांचे प्रश्न अधिक समजून घेता आले. या विभागात वर्षभरात खास महिलांसाठी ‘घडवू आपण आपल्याला’ हा उपक्रम त्यांनी राबवला. घनकचरा विभागात काम करणे हे एक कायम आव्हान असते. ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ याअंतर्गत पुणे नं. १ ला आणण्यासाठी १०० टक्के देण्याचा प्रयत्न केला.

मोळक यांनी सफाई कामगार हेच आपले ‘रियल हिरो’ ही संकल्पना मांडली. सफाई कामगारांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. मोळक साहेबांनी सफाई कामगारांसोबत पहिला सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकला आणि ही एक चळवळ झाली. या कर्मचाऱ्यांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलण्यात मोळक यांचा मोठा वाटा आहे. प्रशासकीय सेवेतील स्वप्नपूर्तीचा आनंद घेत आता त्यांची ‘सेकंड इनिंग’ ही श्रीक्षेत्र तुळापूर येथे शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारला जाणारा ‘शिवशंभूतीर्थ’ हा प्रकल्प आहे. समाजाभिमुख मोळक यांना पुढील कार्यास सदिच्छा!

- प्रवीण गायकवाड

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62282 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top