प्रहारच्या वार्षिक सभेस ५०० दिव्यांग उपस्थित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रहारच्या वार्षिक सभेस 
५०० दिव्यांग उपस्थित
प्रहारच्या वार्षिक सभेस ५०० दिव्यांग उपस्थित

प्रहारच्या वार्षिक सभेस ५०० दिव्यांग उपस्थित

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः प्रहार दिव्यांग शासकीय-निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय वार्षिक सर्वसाधारण सभा आणि परिषद उत्साहात नुकतीच झाली. राज्यातील सुमारे ५०० दिव्यांग प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला.
सिंहगड रस्त्यावरील राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले सभागृहात ही बैठक झाली. संघटनेचे पुणे अध्यक्ष हरीष आल्हाट यांनी स्वागत केले. या सभेस संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्यासह कार्यकारिणीतील बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सभेचा अजेंडा सादर करण्यात आला. २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सेवक व अधिकाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन चालू करण्याबाबत कार्यवाही करण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. जिल्हाध्यक्षाची निवड सर्वानुमते केली. याप्रसंगी उत्कृष्ट कार्याबद्दल हरीष आल्हाट यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62286 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top