ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा कट : ढोले-पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसींना राजकीय आरक्षणापासून
वंचित ठेवण्याचा कट : ढोले-पाटील
ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा कट : ढोले-पाटील

ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा कट : ढोले-पाटील

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : ‘‘समर्पित आयोगाच्या नकारात्मक कार्यपद्धतीवर ओबीसी संघटनांचा आक्षेप आहे. दिशाभूल करून ओबीसी लोकसंख्येची आकडेवारी सादर करण्याचा प्रयत्न होत आहे. ओबीसी समाजाला कायमस्वरूपी राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा कट केला जात आहे. मात्र, हा डाव हाणून पाडण्यासाठी तीव्र लढा उभारला जाईल,’’ असा इशारा ओबीसी वेल्फेअर फाउंडेशनचे मृणाल ढोले-पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

या वेळी चंद्रकांत भुजबळ, ॲड मंगेश ससाणे, कमलाकर दरोडे, सुनीता भगत, अण्णा राऊत आदी उपस्थित होते. ढोले-पाटील म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेल्या माहितीच्या आधारावर समर्पित आयोग अहवाल तयार कसा करू शकतो, हा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरुन आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याची जाणीवपूर्वक इच्छा दिसते. ओबीसी न्याय मिळावा असे वाटत असेल, तर आयोगाच्या अध्यक्षांना जबाबदारीतून मुक्त करावे.’’
चुकीच्या माहितीच्या आधारावर आयोगाने अहवाल सादर करून नये; अन्यथा ओबीसींकडून राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची जबाबदारी आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची असणार आहे. यासह विविध मागण्यांचे पत्र आयोगाला पाठविले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62313 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top