सुपरकंप्युटींग मिशनचा सर्वसामान्यांना फायदा : डॉ. दरबारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपरकंप्युटींग मिशनचा सर्वसामान्यांना फायदा : डॉ. दरबारी
सुपरकंप्युटींग मिशनचा सर्वसामान्यांना फायदा : डॉ. दरबारी

सुपरकंप्युटींग मिशनचा सर्वसामान्यांना फायदा : डॉ. दरबारी

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः नॅशनल सुपरकंप्युटींग मिशन (एनएसएम) केवळ संशोधन संस्थांपुरते मर्यादित राहीले नाही तर कोरोनाकाळात औषधांचा पुर्नर्वापर, आयुर्वेदिक औषधांच्या गुणधर्मांचा पडताळणी आणि चक्रीवादळ किंवा नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देणारी प्रणाली सुपरकंप्युटींग मिशनचे फलित आहे. त्यामुळे केवळ शास्रज्ञांना नाही तर थेट सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी एनएसएमचा फायदा होत आहे, असे मत एनएसएमचे संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी व्यक्त केले.

विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (व्हीआयआयटी) येथे रूबीस्केप डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन डॉ. दरबारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला रूबीस्केपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत पानसरे, विश्वकर्मा विद्यापीठाचे (अभिमत) अध्यक्ष भरत अग्रवाल, केदार सबनीस, केंद्राचे संचालक डॉ. विवेक देशपांडे, अधिष्ठाता डॉ. अतुल कुलकर्णी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विदाविज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. परीक्षित महाले आदी उपस्थित होते. डॉ. दरबारी यांनी एनएसएमचे भविष्यकालीन दृष्टीक्षेप यावेळी मांडला. विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशिन लर्निंगशी निगडित प्रयोगांसाठी उच्च गणन क्षमता (एचपीसी), कॉम्प्युटर व्हीजन, जीपीयु, ग्रिड कॉम्प्युटिंग, डीप लर्निंग आदी प्रयोगशाळेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहे.

डॉ. दरबारी म्हणाले....
- उच्च क्षमता संगणन प्रणाली देशाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा कणा
- कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सामाजिक उत्थानासाठी .
- स्टार्टअप्स आणि एआयची वाढती गरज पाहता ऐरावत सिस्टिम अस्तित्वात येणार
- येत्या काळात १००० पेटा फ्लॉप पर्यंत एचपीसी प्रणाली विकसित होणार
- कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याच्याशी निगडित सर्व प्रणालींचे स्वदेशीकरण शक्य
- एक्झा स्केल कॉम्प्युटिंग सिस्टमसाठी प्रयत्न

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62344 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top