राजीवनगर येथे नवविवाहितेची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजीवनगर येथे नवविवाहितेची आत्महत्या
राजीवनगर येथे नवविवाहितेची आत्महत्या

राजीवनगर येथे नवविवाहितेची आत्महत्या

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : माहेरहून दुचाकी, सोन्याचे दागिने आणण्यासाठी पतीकडून होणाऱ्या छळास कंटाळून एका १९ वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना विमाननगर परिसरातील राजीवनगरमध्ये घडली.
संजना मनीष त्रिभुवन असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी संजनाची आई योगिता त्रिभुवन (रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून वानवडी पोलिसांनी पती सागर देविदास पंडित (वय २२, रा. राजीवनगर, विमाननगर) आणि अन्य दोन नातेवाईक महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुचाकी, सोन्याची अंगठी आणि चेनसाठी संजना हिला सासरी मारहाण केली जात होती. शारीरिक आणि मानसिक त्रास देवून पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पती सागर पंडित याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ए. आर. गांधले करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62402 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top