विना परवाना औषधांचा साठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विना परवाना औषधांचा साठा जप्त
विना परवाना औषधांचा साठा जप्त

विना परवाना औषधांचा साठा जप्त

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : शहरातील आर. व्ही. कंपनीच्या आवारातील विना परवाना होमिओपॅथिक औषधांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी जप्त केला. जप्त केलेल्या औषधांची किंमत ३८ हजार ९१८ रुपये आहे.
या बाबत ‘एफडीए’चे सहायक आयुक्त दिनेश खिंवसरा म्हणाले, “विना परवाना औषधांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर ही कारवाई करण्यात आला. होमिओपॅथिक औषधांची विक्रीसाठी औषध परवाना बंधनकारक आहे. हा परवाना नसल्याने औषध साठा जप्त करण्यात आला.”
ही कारवाई ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक शामल महिंद्रकर आणि रझिया शेख यांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62403 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top